BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : आयआयसीएमआर येथे सोमवारपासून तीन दिवसीय दीक्षारंभ कार्यक्रमाला सुरुवात

एमपीसी न्यूज- आयआयसीएमआर, निगडी येथे एमसीएच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि 12) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

एमसीएच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य मॉड्युलर इन्फोटेकचे कार्यकारी अधिकारी राहुल काळे, कायनेटिक कॉम्युनिकेशसचे संचालक डॉ. दीपक शिकारपूर, संस्थेचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी आणि संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. राहुल काळे यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ट्रेण्ड्स २०२० बद्दल महिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनपर कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली.

दीक्षारंभ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी विजय मुखेडकर यांचे विपश्यना साधनेंबद्दल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यानंतर एमसीए अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थांना देण्यात येईल. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी उद्या, बुधवारी मिस. अनामिका दासगुप्ता यांचे सॉफ्ट स्किल व त्याचे महत्व त्याबद्द्ल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी सागर लोधी यांचे मॅनॅजमेन्ट गेम्स आणि फन फेअर हॅपी अवर्स@आयआयसीएमआरचे आयोजन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3