Nigdi : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टला स्क्रीन, प्रोजेक्टर, लॅपटॉप भेट

एमपीसी न्यूज – इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे निगडीच्या गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या अभ्यासिकेसाठी स्क्रीन, प्रोजेक्टर, लॅपटॉप भेट देण्यात आला.

निगडी येथील गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पदवीधर आणि स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवली जाते. या अभ्यासिकेला इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे स्क्रीन, प्रोजेक्टर, लॅपटॉप भेट देण्यात आला. येथील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी व्याख्यान, चर्चासत्र किंवा कार्यशाळा घेतल्यास या वस्तूंचा त्याना उपयोग होऊ शकतो. या हेतूने ही मदत देण्यात आली.

यावेळी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्ष प्रतिभा दलाल, रेखा मित्रगोत्री, सुजाता ढमाले, निर्मलकौर भोगल, साधना काळभोर तसेच गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे जाधव तसेच ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभ्यासिकेचे प्रमुख श्री भोळे यांनी आभार व्यक्त करीत येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या वस्तूंचा खूप उपयोग होणार असल्याचे सांगितले. ट्रस्टच्या वतीने या उपक्रमासाठी विशेष समनव्य साधणाऱ्या सुधाकर जोशी आणि गीतांजली जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.