Nigdi: जैन मंदिरात होणारा महावीर जन्मोत्सव सोहळा रद्द

घरीच जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज –  कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (6 एप्रिल) होणारा  महावीर जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे. या दिवशी होणारे दोन्ही अभिषेक मंदिरातील पंडित यांच्याद्वारे पार पाडले जातील.  दरम्यान कोणत्याही श्रावक व श्राविकेला मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट आणि पार्श्व पद्मावती महिला मंडळ यांच्यातर्फे देण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी सुरक्षितपणे ‘घर घर में महावीर जन्मोत्सव’ साजरा करण्याचे ट्रस्टकडून सुचविण्यात आले आहे. यामध्ये घरामध्ये धर्मध्वज लावून आणि मोठ्या प्रमाणात दीपोत्सव करून कोणालाही त्रास  होणार नाही, याची काळजी घेत महावीर जन्मोत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच देशावर आलेल्या आरोग्य संकटात हातभार म्हणून पंतप्रधान व मुख्यमंत्री मदत निधीला दान करण्याचे आव्हाने ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. यासाठी 9922439251 & 9822098176 या क्रमांकावर संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले आहे. जमा झालेला निधी ट्रस्टच्या वतीने सरकारकडे सुपूर्त केला जाईल.

सरकारच्या आदेशानुसार निगडी प्राधिकरण येथील महावीर जैन मंदिर 18 मार्च रोजी बंद करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी होणारा महावीर जन्मोत्सव सुद्धा रद्द करण्यात आला असून त्या दिवशी मंदिर बंद राहणार आहे. भाविकांना कळविण्यात येते की यादिवशी मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मंदिराजवळ गर्दी करू नये. या ऐवजी ‘घर घर मे महावीर जन्मोत्सव’  साजरा करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील, खजिनदार विरेंद्र जैन, सचिव अरुण चौगुले आणि ट्रस्टी प्रकाश‌ शेडाबळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.