Nigdi: रस्त्यावर उभा केलेला ‘जेसीबी’ पालिकेने केला जप्त

एमपीसी न्यूज – निगडीतील वाहतूक पोलीस नियंत्रण कार्यालयाच्या शेजारी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला जेसीबी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जप्त केला आहे. पिंपरी, नेहरुनगर येथील कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जेसीबी ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात निगडी वाहतूक पोलिसांचे कार्यालय आहे. वाहतूक पोलीस नियंत्रण कार्यालयाच्या शेजारील रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक दिवसांपासून हा जेसीबी बंद अवस्थेत उभा होता. यामुळे अडचण निर्माण झाली होती.

त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार हा नादुरुस्त जेसीबी महापालिकेने जप्त केला आहे. पिंपरी, नेहरुनगर येथील कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जेसीबी ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.