Nigdi News: घरफोडी करून दागिने आणि रोकड लंपास

घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे जुने मणी असेलेली 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि.9) सकाळी पावणे अकरा वाजता ओटास्कीम, निगडी येथे उघडकीस आली.

अनिल अंबादास साळवे (वय 44, रा. वानवडी, पुणे. मूळ रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आई-वडील ओटास्कीम निगडी येथे राहतात. 30 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांच्या घराचे लॉक तोडून, कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे जुने मणी असेलेली 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.