Nigdi : दुर्गा टेकडीवर बहरलेल्या करवंदांना शहरीकरणाचा फटका, फुले व फळ धारणेचे प्रमाण कमी

एमपीसी न्यूज  – निगडी येथील दुर्गा टेकडी परिसरात करवंद हा रानमेवा बहरला आहे. पण ही फळे आकाराने छोटी आणि कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. टेकडी वनीकरणाने विकसित (Nigdi) झाल्यामुळे करवंदाला पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. सध्या परिसरात 500 पेक्षा अधिक जाळ्या फुले आणि फळाविना आढळून आल्या आहेत. खुरट्या आणि छोट्या जाळ्यांचे प्रमाण अधिक आहे. काही जाळ्या या गिरीपुष्षा आणि इतर विदेशी लागवड केलेल्या वृक्षाखाली आढळतात कारण या जाळ्यांचे आता परत पुनर्वसन होऊन परत उगवताना दिसत आहे.‌ अशा सावली खाली असलेल्या करवंदाच्या जाळ्यांची फक्त शाखीय वाढ होऊन, झुडुपांऐवजी वेलीत रूपांतर  झालेले आहे मात्र या वेलांना फुले आणि फळधारणा होत नाही.

मात्र टेकडीवरील नैसर्गिक स्थितीमध्ये आढळणाऱ्या झुडूपांना काही अंशी फुले फळे येत आहेत. 1975 साली आकुर्डी आणि निगडी गावातील लोक रानमेवा खाण्यासाठी दुर्गा टेकडी आणि दुर्लक्षित हनुमान टेकडीवर जात असत. आणि त्यावेळेस हा रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता असे आकुर्डी निगडी गावातील जुनेजाणते लोक सांगतात. परंतू टेकडी विकासामध्ये करवंदीच्या काटेरी जंगलाची कत्तल  करून तेथे बागा तयार करून परदेशी वृक्ष लावण्यात आले.

Pune : तल्याठ्याकडून काम करवून घेण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी चिंचवड मधील मोशी आणि चऱ्होली परिसरातील टेकड्या तसेच भंडारा, घोराडेश्वर आणि भामचंद्र येथे देखील करवंद आहेत. तेथे डोंगर खोदून केलेले बागबगीचे अशा गोष्टी नाहीत, तरीदेखील जाळ्यांचे आणि त्यास येणाऱ्या फुला फळांचे प्रमाण कमी आहे. बऱ्याच ठिकाणी करवंदीच्या जाळयांचे प्रमाण जरी जास्त असली तरी फुलधारणा आणि फळधारणा कमी प्रमाणात होते असे आढळून आले आहे. फळांचे आकारमान देखील लहान आढळून आले आहे. एकंदरीतच  प्रथमदर्शनी हवामानाचा आणि शहरीकरणाचा करवंद फळांच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे.

आता काही वर्षांनंतर जर दुर्गा टेकडीवर पूर्वी असलेल्या वनस्पतींचे पुर्नवसन म्हणजेच इकोरेस्टोरेशन होत असेल तर ही चांगली बाब आहे. मात्र अशा विकासकामांमुळे करवंदाचा अधिवास आणि स्वरुप बदलले आहे. मावळ आणि पश्चिम पट्ट्यात  करवंदाना भरपूर फुले आणि फळे येतात परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील टेकड्यांवर याचे प्रमाण कमी आहे. पावसाचे प्रमाण आणि परागीभवन या परिस्थितीवर करवंदाचे फुले आणि फळांचे प्रमाण अवलंबून आहे. या परिसरात करवंद उशिरा पिकतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात करवंदाला फळे कमी प्रमाणात का येतात, यावर संशोधन करणे गरजेचे (Nigdi) आहे.

प्रा किशोर सस्ते
वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.