Nigdi : खान्देश मराठा मंडळाचा निगडीमध्ये वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : खान्देश मराठा मंडळाचा निगडी (Nigdi) येथे 26 जानेवारी रोजी 36 वा वार्षिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंडळाचे अध्यक्ष मधुकर सोनू पगार व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते खान्देशातील लोकप्रिय आणि सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आदी क्षेत्रात समाजाभिमुक कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. खान्देश भूषण पुरस्काराने डॉ. प्राचार्य दिलीप शिंदे, आणि फकीरा दगा पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

खान्देश उद्योजक पुरस्काराने प्रकाश भीमराव पाटील आणि दीपक काशिनाथ पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तर
विशेष कार्य म्हणून निवड झाल्याबद्दल रवींद्र शाळीग्राम पाटील (महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्याचे सह आयुक्त), अभिजीत राजेंद्र पाटील (IAS), देवराज मनिष पाटील (IPS), करण धर्मेंद्र पाटील, भिला सोनू पाटील यांना सन्मानित करण्यात आले. हिंदी साहित्य लेखक, गझलकार प्रा. संजय पवार आणि नेहा पवार यांना सन्मानित करण्यात आले.

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी  युवराज साळुंखे (कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य), हंबीरराव चव्हाण (सुप्रसिद्ध उद्योजक), अरविंद सूर्यवंशी (अधीक्षक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य),  डॉ. तुषार शेवाळे यांना (Nigdi) विशेष निमंत्रण होते.

कार्यकारणी कमिटीतील उपाध्यक्ष एस.आर,पाटील, सचिव प्रदीप दामोदर शिंदे, खजिनदार भास्कर दगडू पाटील, सहसचिव अनिल फकिरा सावंत, हिशोबनीस जयवंत विनायक सिसोदे, कृष्णराव चैत्राम अहिरराव, मिलिंद भास्कर पाटील, संजय भागवत पाटील, सुरेश भगवान पाटील आणि मार्गदर्शक कमिटीतील बी.के. पाटील, संतोष दामोदर पाटील, बी.डी. पाटील, माधव बाबुराव पवार, गंगाराम सखाराम पाटील आदी मान्यवरांसह कार्यक्रमासाठी स्थानिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळांच्या भावी कार्यासाठी आणि नव्या प्रस्तावित इमारतीच्या निर्माणासाठी पाठींबा आणि शुभेच्छा दिल्या.

PCMC : अधिकारी, कर्मचा-यांच्या उत्तम कामकाजामुळे नागरिकांना उत्कृष्ठ सेवा – अतिरिक्त आयुक्त जगताप

अध्यक्षीय भाषणात खान्देश मराठा मंडळाच्या अध्यक्ष्यांनी मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील होतकरू कार्यकत्यांना मंडळासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप दामोदर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल फकीरा सावंत यांनी केले.

मागील काही महिन्यात मयत झालेल्या सदस्यांना (Nigdi) श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बी. के. पाटील यांनी आभार प्रदर्शन करून सर्वांना जेवणाचा आस्वाद घेण्याची विनंती केली. आलेल्या सभासदांनी ऑर्केस्ट्रातील मजेशीर गीतांचा व जेवणाचा आस्वाद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.