Nigdi : श्री खंडोबा मंदिरामध्ये कार्तिक स्नान निमित्त आयोजित काकडा आरतीची सांगता

एमपीसी न्यूज- निगडी येथील श्री खंडोबा मंदिरामध्ये कार्तिक स्नान निमित्त एक महिन्यापासून काकडा आरती चालू होती. या काकडा आरतीची सांगता हभप अर्जुन महाराज फलके यांचे काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांचे वडील शंकरराव शेळके व बाळासाहेब काजळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

हभप अर्जुन महाराज फलके यांचा शेळके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सव॔ भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप सोपान महाराज पठारे यांनी केले. आभार श्री खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.