Nigdi : ‘खिदमद-ए -आवाम’चे दातृत्व : झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना 950 जीवनावश्यक किटचे वाटप

एमपीसीन्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराने लॉकडाऊन लागू केल्याने सर्वात जास्त हाल गोरगरीब नागरिकांचे होऊ लागले. अशावेळी आकुर्डी येथील खिदमद-ए -आवाम सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. आतापर्यंत 950 नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.

खिदमद-ए -आवामकडून झोपडपट्ट्यांमधील गोरगरीब, हातावर पोट असलेले, रोजंदारीवरील मजूर, भिक्षेकरी, स्थलांतरित नागरिक आणि बेघरांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप केले. यामाध्यमातून गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच त्यांची उपासमारही टाळली. त्यामुळे गोरगरीब नागरिकांकडून या सेवाभावी संस्थचे आभार मानण्यात येत आहे.

या किटमध्ये पाच किलो पीठ, 3  किलो तांदूळ, 100 ग्रॅम हळद, अर्धा किलो मीठ, 2  किलो गोडेतेल, मिरची 1  किलो, प्रत्येकी 1  किलो तूरडाळ व मसूरदाळ आणि एक किलो साखर आदी साहित्याचा समावेश आहे.  या कामी डॉ. आशपाक बांगी, रिझवान शेख, नईम पटेल, वसीम सय्यद, जावेद झेंडे,  हूजेफा खान,  शादाब सय्यद, सलीम शेख, शफीक शेख, अझहर शेख, साबीर शेख, हारून खान, हंजाला खान, मुनीस शेख, इम्रान शेख, उस्मान खान, नासिर पठाण, प्रवीण चरक आदींनी सहकार्य केले.

याबाबत संस्थेचे अध्यक्ष सोहेल मोमीन म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही गरजूंना ही मदत करीत आहोत. ज्या दानशूर नागरिकांना या कमी सहकार्य करायचे असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.