Nigdi : लॉकरमधील दागिन्यांचा बँक कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याप्रकरणी कर्मचा-यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांचा बँकेतील कर्मचाऱ्यांनी अपहार केला असल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत कोटक महिंद्रा बँकेच्या प्राधिकरण शाखेत घडली.

ले. कर्नल सचिन रघुनाथ टिळेकर (निवृत्त) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बँकेच्या कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण मधील सेक्टर क्रमांक 25 मध्ये कोटक महिंद्रा बँक आहे. या बँकेत फिर्यादी टिळेकर यांचे खाते आहे. त्यांनी बँकेची लॉकर सेवा घेतली आहे. त्यामध्ये जून 2017 दरम्यान त्यांनी एक लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ठेवले. दरम्यानच्या काळात बँकेतील कर्मचा-यांनी टिळेकर यांच्या परस्पर त्यांच्या लॉकरमधून दागिने काढून त्याचा अपहार केला असल्याचे टिळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.