Nigdi : बंद फ्लॅटमधून एक लाखाचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – बंद असलेल्या दोन फ्लॅटमध्ये घुसून घरातील 93 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना आशीर्वाद कॉलनी, अप्पूघर, निगडी येथे घडली.

मुकेश ओमप्रकाश शर्मा (वय 34, रा. आशीर्वाद कॉलनी, अप्पूघर, निगडी. मूळ रा. कारीआदू, ता. दादरी, जि. भिवानी, हरियाणा) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा हे अप्पूघर येथे मेरी रॉबर्ट यांच्या येथे भाड्याने राहतात. शनिवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास ते कामानिमित्त बाहेरगावी गेले. दरम्यान त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील 93 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. रविवारी (दि. २५) रोजी रात्री दहाच्या सुमारास शर्मा घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.