Nigdi : ….लिएंडर पेस अन् आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात रंगला टेनिसचा सामना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे उत्तम टेनिसपटू आहेत. आंतरराष्ट्रीय टेनिसपटू लिएंडर पेस शहरात आले असता आयुक्तांना त्यांच्यासोबत टेनिस खेळण्याचा मोह आवरला नाही. लिएंडर पेस आणि आयुक्त हर्डीकर यांच्यामध्ये टेनिसचा सामना रंगला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर 25, निगडी येथील चक्रवर्ती भरत टेनिस कोर्ट येथे नवोदित टेनिसपटूंना लिएंडर पेस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि लिडॅंर पेस यांच्यात टेनिसचा सामना रंगला.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “लिएंडर पेस, रामनाथन रामकुमार, अर्जुन कढे यांच्यामुळे शहरातील नवोदित टेनिसपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून मार्गदर्शनाची संधी प्राप्त झाली आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे महत्वाचे आहे. 16 व्या वर्षानंतर दहावीमुळे मुलं खेळ सोडून उच्च शिक्षणाकडे वळतात. यामुळे चांगली प्रतिभा असून देखील चांगले खेळाडू निर्माण होत नाहीत. सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. खेळाडूंनी त्यांचा लाभ घेऊन खेळांमध्ये प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.