Nigdi : अंतकरणातून आलेल्या शब्दांच्या ओळी म्हणजे कविता – राज अहेरराव

एमपीसी न्यूज : एखाद्याच्या अंतकरणातून आलेल्या शब्दांच्या (Nigdi) ओळी म्हणजे कविता. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी विद्यार्थी कविसंमेलनात व्यक्त केले.

स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिं. चिं. पुणेच्या वतीने, मंगळवार दि. 6 डिसेंबर रोजी ज्ञानप्रबोधीनी गुरुकुल, प्राधिकरण, निगडी येथे विद्यार्थी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात ज्ञानप्रबोधीनी नवनगर व ज्ञानप्रबोधीनी गुरुकुलचे असे एकूण 30 विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या कविता आदर केल्या. अहेरराव पुढे म्हणाले कि, कविता आकारताना ताल, लय आणि स्वारांचा विचार करावा. कविता ऐकताक्षणी ऐकणाऱ्याच्या काळजात रूजायला हवी. देशप्रेमाचा अर्थ स्वतःवर प्रेम करणे असाही होतो.

प्रमुख पाहुणे सुरेश कंक विद्यार्थ्यांना म्हणाले कि, आई-वडील, गुरुजन यांचे विचार आत्मसात करा. प्राणपणाने लढून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. याचे जतन करणे युवा पिढीच्या हाती आहे. यावेळी गझलकार सुहास घुमरे, गझलकार विवेक कुलकर्णी आणि कवयित्री सीमा गांधी यांनी देशभक्तीवरील उत्कृष्ट अशा रचना सादर करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला.

यावेळी विराज माळी आणि गौरव यांनी ‘माझा भारत’ ही अतिशय (Nigdi) परिपक्व विचारांची कविता सादर केली. अनन्या माजगावकर या विद्यार्थिनीने सामाजिक भान असलेली देशभक्तीवर कविता सादर केली. अवनी गटने हिने सामाजिक जागरूकता आपल्या कवितेतून मांडली.

नचिकेत बरपांडे याने ‘संकल्पविण उद्दिष्ट्य विण, असा कोणाचा श्वास नाही|’ ‘मेलेल्याचा मरगळल्याचा, भारताचा इतिहास नाही।’ या देशभक्तीपर ओळी सादर केल्या. त्याचबरोबर चैतन्य दीक्षित, सोहम खटावकर, वैष्णवी भुजबळ, तन्मय महाजन, समीक्षा आगवणे, माधव फुलपगार, अमेय पानसरे, जुई सिनकर, मोक्षदा जोशी, सागरीका गोपीशेट्टी, अधिराज अगरवाल, शर्वरी कोकणे, गार्गी तरोळे, अमृतांशू माने, स्वरा उत्तुले, आदिनाथ तारकुंडे, श्रीवर्धन पानसरे, काव्या ठाकूर, हर्षदा पिसोळकर, सुश्रिता कानडे, श्रीहरी अभ्यंकर या आणि इतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर एकाहून एक सरस अशा कविता सादर केल्या.

Maharashtra Education : बदली प्रमाणपत्राशिवायही शाळांमध्ये प्रवेश मिळणार; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा

या कार्यक्रमाला पुरुषोत्तम सदाफुले, तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, डॉ. अगरवाल, शोभा जोशी, मूरलीधर दळवी, वैशाली गावंडे, भागवत या मान्यवरांची विशेष उपस्थित होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुलच्या समन्वयक राजश्री मराठी यांनी केले. सविता इंगळे यांनी स्वयंसिद्धा प्रतिष्ठानची उद्दिष्टे सांगितले. या कार्यक्रमासाठी श्रीराम इनामदार, आदित्य शिंदे, सुधीर कुलकर्णी, अंजू तिवारी, नंदकुमार मुरडे, कुलकर्णी मॅडम तसेच ज्ञान प्रबोधनी गुरुकुल येथील इतर शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. वर्षा बालगोपालने सूत्रसंचालन केले. कुलकर्णी मॅडम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.