Nigdi Lockdown News : सेवाभावी संस्थांकडून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना फूड पॅकेट व पाणी वाटप

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन आणि कोरोना संकटकाळात गरजू नागरिकांसह स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना फूड पॅकेट व पाणी वाटप करण्यासाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. केटीटी फाऊंडेशन, पोलीस व नागरिक मित्र संघटना, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप, पुणे व मौनी बाबा आश्रम यांच्या सहकार्याने हे वाटप करण्यात आले.

अक्षय तृतीया व रमजान ईद निमित्त आज (शुक्रवारी, दि.14) या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने औंध येथील अनाथ, गोरगरीब व निगडी येथील स्मशानभूमीतील कर्मचा-यांना संघटनेच्या वतीने फूड पॅकेट व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

या सेवा कार्यात वासुदेव काळसेकर, लक्ष्मण शिंदे, चंद्रभान गायकवाड, किशोर जगताप, विशाल काळे, शेवाळे, अशोक तनपुरे यांनी सहभाग घेतला होता. तर, पद्मजा देशपांडे, सुप्रिया खुळे, शिंदे यांनी   विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.