Nigdi : महिला विकास फौंडेशनतर्फे उद्यापासून महिलांसाठी पाककृती प्रशिक्षण शिबिर

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला विकास फाउंडेशन संस्थेच्या वतीने तिळगुळापासून तीळवडी व खजूरापासून बनवल्या जाणाऱ्या लाडू इत्यादी वस्तूचे उत्पादन करण्याबाबतचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार 2 व शुक्रवार 3 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते साडेचार या वेळेमध्ये यमुनानगर येथील सावित्रीबाई फुले हॉल या ठिकाणी होणार आहे.

आयोजित तिळगुळापासुन तीळवडी व खजूर पासून बनवल्या जाणाऱ्या लाडू इ त्यादी वस्तूचे ,उत्पादन करण्याबाबतचे मोफत प्रशिक्षण प्रशिक्षिका सौ सविता महाजन या दिनांक – 2 व 3 जानेवारी या दिवशी दुपारी 12.30 ते 4.30 या वेळेमध्ये यमुना नगर निगडी येथील सावित्रीबाई फुले हॉल या ठिकाणी देण्यात येणार असून.

या प्रशिक्षणामध्ये शिकविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाचे उत्पादन सुरू करून पुणे व परिसरातील औद्योगिक अस्थापनांना पुरवठा करण्यात येणार आहे यासाठी निगडी, पिंपरी चिंचवड परिसरातील इच्छुक महिलांनी उपस्थित राहुन या पाककृती शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सुलभा उबाळे व संस्थेच्या संचालिका पियुषा पवार, सीए श्रद्धा अग्रवाल, अपर्णा देशपांडे यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांना 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगार व स्वयंरोजगार तसेच विविध व्यवसायिक प्रशिक्षण, मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आदी योजनांच्या मार्गदर्शनासाठी संस्थेने शनिवार वाड्याजवळील शनिवार पेठेत श्रीपाल चेंबर्स पहिला मजला येथे महिला विकास फाउंडेशनचे कार्यालय सुरू केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.