Nigdi : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – गांजाची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 23 हजार 250 रुपायांचा 930 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवई केली.

कार्तिक संभाजी कारके (वय 21, रा. आंबेवाडी, उर्से, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी कारके हा गांजा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, निगडीतील यमुनानगर रुग्णालयाच्या जवळ आझाद चौक येथे पोलिसांनी सापळा रचून कारके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 23 हजार 500 रुपयांचा 930 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.