Nigdi: ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या प्रमुखपदी मनोज देवळेकर

Nigdi: Manoj Devalekar as the head of dnyan prabodhini Nigdi Kendra देशसेवा करू शकणारे सामर्थ्यवान युवक युवती घडावेत यासाठी प्रबोधिनीची शाळा या भागात आपण चालवत आहोत.

एमपीसी न्यूज- ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राच्या प्रमूख पदावर मनोज देवळेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ कार्यक्रमाचे सोमवारी (दि.22) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आंतरजालाच्या माध्यमातून (इंटरनेट) घेण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. वा. ना. अभ्यंकर यांनी या कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर केली. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी पाठविलेल्या लेखी नियुक्तीचा संदर्भ देत ही घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना भूतपूर्व केंद्रप्रमुख डॉ. वा. ना. अभ्यंकर यांनी ज्ञान प्रबोधिनीची विकसित झालेली बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठीची शिक्षण प्रणाली सर्वांसाठी विकसित करण्याचा हेतू स्पष्ट केला.

देशसेवा करू शकणारे सामर्थ्यवान युवक युवती घडावेत यासाठी प्रबोधिनीची शाळा या भागात आपण चालवत आहोत. हा मूळ हेतू यापुढील कार्यसंचाने लक्षात घेतला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ज्ञान प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून स्वतःला सामर्थ्यसंपन्न करायचे आणि आपली सामर्थ्यशक्ती देशाची सेवा करण्यासाठी वापरायची आहे असे मार्गदर्शन त्यांनी केले.

मनोज देवळेकर हे ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथील माजी विद्यार्थी असून पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून ते निगडीच्या कामात सहभागी झाले. सुरुवातीच्या काळात युवक संघटन आणि त्यानंतर क्रीडा क्षेत्रात अभिनव प्रयोग त्यांनी केले.

क्रीडाकुल हा खेळाडू घडविणाऱ्या शाळेचा प्रयोग त्यांनी उभा केला. गेली 22 वर्षे क्रीडाक्षेत्रातला हा प्रयोग यशाची अनेक शिखरे गाठतो आहे. कार्यक्रमासाठी कल्पेश कोठाळे, आरती बिजुटकर यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like