Nigdi: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा; रक्तदान शिबिरात 150 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – निगडी, रुपीनगर येथील मराठवाडा युवा मंचातर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 150 जणांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पंकज भालेकर, स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर, शरद भालेकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सुखदेव नरळे, राजेंद्र तापकीर , शांताराम द. भालेकर , अमोल भालेकर , रवींद्र सोनवणे , शरद भालेकर , नरेंद्र भालेकर ,किशोर बोडके, अर्जुन पवार , रामदास कुटे उपस्थित होते.

यावेळी प्रवीण भालेकर म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. म्हणून आजचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठवाडा युवा मंचाचे अध्यक्ष खंडू सगळे , सतीश कंठाळे , औदुंबर पाडुळे, दीपक बोर्डे, सर्जेराव कचरे , सोमनाथ मंडलिक, विठ्ठल शिंदे , अजय आजबे, महादेव तांबे , उद्धव सरवदे, पांडुरंग कदम , त्रिंबक मुळीक , मुरलीधर सगळे, बाबू बांदल , जगदीश खोजे , गोरख दुबाले, सोमनाथ तुपे आदींनी श्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.