Nigdi: मराठवाडा युवा मंचातर्फे शनिवारपासून भव्य अखंड हरिनाम सप्ताह

एमपीसी न्यूज – रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंचाच्या  वतीने श्री संत नगदनारायण  महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार (दि.14) ते शुक्रवार  (दि.20) दरम्यान भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोनिगरा मैदान रुपीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार (दि.14) ते शुक्रवार  (दि.20) दरम्यान दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, सकाळी आठ वाजता विष्णु सहस्त्र नाम, दहा वाजता गाथा भजन , दुपारी एक वाजता भजन , सायंकाळी पाच वाजता हरिपाठ व रात्री आठ वाजता कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे

शनिवार (दि. 14) रोजी प्रवचनकार हभप. बाळकृष्ण महाराज बुरकुल नांदगाव , रविवार (दि.15) रोजी प्रवचनकार पंडित महाराज क्षीरसागर आळंदी, सोमवार (दि.16) रोजी  प्रवचनकार प्रवीण महाराज लोळे आळंदी , मंगळवार (दि.17)  प्रवचनकार  ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा , बुधवार (दि.18)  प्रवचनकार आक्रूर महाराज साखरे बीड , गुरुवार (दि.19)   प्रवचनकार रामराव महाराज ढोक नागपूर , शुक्रवार (दि.20)  रोजी पविनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे बीड यांच्या प्रवचन व कीर्तनाची सेवा होणार आहे.

शनिवार (दि.21)  रोजी  श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथील शिवाजी महाराज  यांच्या काल्याचे कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष खंडू सगळे यांनी दिली. उपाध्यक्ष सतीश कंठाळे , औदुंबर पाडुळे, सोमनाथ मंडलिक, सर्जेराव कचरे , दीपक बोर्डे, उद्धव सरोदे , महादेव तांबे , अजय आजबे, विठ्ठल शिंदे वनदेव खामकर , त्रिंबक मुळीक , पांडुरंग कदम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.