Nigdi: लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या अध्यक्षपदी मारुती मुसमाडे

Maruti Musmade as President of Lions Club of Poona Nigdi

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या अध्यक्षपदी मारुती मुसमाडे यांची, तर  सचिवपदी डी. एस. बेहेरा आणि खजिनदारपदी मिनांजली मोहिते यांची 2020-2021 या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.  

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक 3234 डी 2 चे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी लायनिझम वर्षे 2020-2021 ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली.

यामध्ये लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या आतापर्यंतच्या सेवाकार्याचा अनुभव लक्षात घेऊन सुदाम मोरे यांची रिजन चेअरपर्सन आणि दिलीपसिंह मोहिते यांची झोन चेअरपर्सनपदी निवड झाली आहे.

लायन्स क्लब इंटरनॅशनल ही स्वयसेवी संस्था जगभरात 209 देशात कार्यरत आहे.

या संस्थेचे 15 लाख सदस्य आहेत. व्हिजन, हंगर, डायबेटिस, एन्हार्यमेंट आणि चाईल्डहूड कॅन्सर अव्हेरनेस हे पाच उद्देश ठेवून हि संस्था सर्व क्लबच्या माध्यमातून सेवाकार्य करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.