Nigdi : तोंडावर गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामूहिक बलात्कार

एमपीसी न्यूज – महिलेच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना निगडी येथे घडली.

याबाबत 21 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्‍तींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी निगडीतील टिळक चौक परिसरातून चालली होती. त्यावेळी तीन जणांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारून तोंडावर रूमाल लावून रिक्षातून अज्ञात ठिकाणी अपहरण करून नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्यावर करण्यात आले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.