Nigdi : अप्पुघर येथील खेळण्यांची दुरुस्ती करा, महापौरांची सूचना

एमपीसी न्यूज – अप्पुघर, निगडी येथील खेळण्यांची देखभाल दुरूस्ती करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.

अप्पुघर, निगडी या ठिकाणी महापालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर जाधव यांनी अप्पुघर उद्यानाची पाहणी केली. नगरसेविका शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, अप्पुघरचे संचालक मेहता उपस्थित होते.

अप्पुघर येथे असलेली खेळणी खराब झाली असल्याने त्याची दुरूस्ती करणे, रंगरंगोटी करणे, नवीन खेळणी बसविणे, अप्पुघरमध्ये मुले व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खेळणी सुस्थितीत ठेवणे, सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे, बंद असलेली खेळणी दुरूस्त करुन चालू करणे, अप्पुघर उद्यानात वृक्षारोपण करणे अशा सूचना महापौर जाधव यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.