Nigdi : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून एका तरुणाने तिचा विनयभंग केला. तसेच याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांना देखील आरोपीने मारहाण करत पोलिसात तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना ओटास्कीम निगडी येथे घडली.

मंगेश उर्फ मंग्या कल्याण टेकाळे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 39 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 3 मार्च आणि 30 मार्च रोजी ओटास्कीम, निगडी येथे घडली. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. ‘आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना’ असे गाणे म्हणत तिच्याशी गैरवर्तन केले.

याबाबत फिर्यादी यांच्या पतीने आरोपीला जाब विचारला असता त्यांना देखील आरोपीने धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच ‘तू जर माझ्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यास तुला बघून घेईल’ अशी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.