Nigdi : राहत्या घरातून तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज – साईबाबा नगर झोपडपट्टी चिंचवड येथून राहत्या घरातून तरुण शनिवारी (दि. 15) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास निघून गेला आहे.सागर सनतकुमार आसदे (वय 21, रा. साईबाबा नगर झोपडपट्टी, भाजीमंडई शेजारी, चिंचवड) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बालाजी सनतकुमार आसदे (वय 31) यांनी निगडी पोलीस ठाण्यात खबर दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शनिवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे. चेहरा गोल, रंग सावळा, उंची पाच फूट, शरीराने सडपातळ, मिशा राखलेल्या असून अंगात निळ्या रंगाचे जॅकेट, पांढ-या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पंधरा बूट घातलेला आहे. त्याच्या उजव्या हातावर सागर नावाचा टॅटू काढलेला आहे. त्याच्याजवळ सॅमसंग मोबाईल आहे. वरील वर्णनाच्या तरुणाविषयी काही माहिती मिळाल्यास निगडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.