Nigdi : फोनवर बोलण्याची जबरदस्ती करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज-अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला फोनवर दुसऱ्या मित्राशी बोलण्यासाठी जबरदस्ती केली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री आठच्या सुमारास निगडी परिसरात घडली.

याप्रकरणी एका 17 वर्षीय पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागेश पाटील आणि नवनाथ पांचाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 13 डिसेंबरपासून पीडित मुलीचा पाठलाग करीत होते. शुक्रवारी रात्री मुलगी घराजवळ थांबली असताना आरोपी पांचाळ याने मुलीचा हात धरला. तिला आरोपी पाटील याच्याशी फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती करीत तिच्याशी गैरकृत्य केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी एम बनसोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.