BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : गरोदर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

282
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – गरोदर महिला घरात एकटी असताना घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी तीनच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक अरुण चांदणे (वय अंदाजे 22, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या 40 वर्षीय पित्याने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित गरोदर महिला रविवारी दुपारी घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी घरात घुसला, त्याने महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. दरम्यान पीडित महिलेचे वडील फिर्यादी घरी आले. त्यांनी हा प्रकार बघितला असता आरोपी फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला आणि पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.