Nigdi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री ओटास्कीम, निगडी येथे घडली.

संजय वाघमारे (वय 45, रा. ओटास्किम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 15 वर्षीय मुलीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी वाघमारे याने तिचा विनयभंग केला. तसेच ही बाब घरातील लोकांना सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.