Nigdi : रस्त्यावर अडवून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – नोकरीवर निघालेल्या तरुणीचा पाठलाग करून तिला रस्त्यावर थांबवून अश्लील हावभाव करून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी सव्वा एकच्या सुमारास निगडी येथे घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित सदाशिव शिवेकर (रा. निगडे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी निगडी येथे एका रुग्णालयात नोकरी करते. बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास तरुणी नोकरीसाठी जात होती. त्यावेळी आरोपीने तिची वाट अडवून थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला. यावरून तरुणीने निगडी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.