Nigdi: पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला

Nigdi: Murderous attack on a young man with a scythe out of prejudice घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. यामध्ये संग्राम हे गंभीर जखमी झाले आहेत.

एमपीसी न्यूज- आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून नऊ जणांनी मिळून तरुणाच्या घरात घुसून कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.1) पहाटे साडेतीनच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.

संग्राम गुरुनाथ भोसले (वय 27, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर शिंदे (वय 22), उमेश दोडमणी (वय 27), आकाश शिंदे (वय 24), रोहित कांबळे (वय 25), राजू, अमोल (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अन्य तीनजण (सर्व रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम यांचे आरोपींसोबत मंगळवारी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून सर्व आरोपी बुधवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात बेकायदेशीरपणे आले.

आरोपींनी संग्राम यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. तसेच संग्राम यांचे आई, वडील, भाऊ आणि वाहिनी यांना देखील मारहाण करून दुखापत केली.

घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. यामध्ये संग्राम हे गंभीर जखमी झाले आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like