Nigdi : नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती, स्त्रीशक्ती महोत्सव ; नगरसेवक अमित गावडे यांची माहिती

एमपीसी न्यूज- प्रत्येक स्त्रीशक्तीमध्ये एक आदिशक्ती असते. तिच्या कलागुणांवा वाव देण्यासाठी श्री समर्थ युवक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2019 दरम्यान आदिशक्ती, स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याबाबतची माहिती श्री समर्थ युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, नगरसेवक अमित गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

निगडी, प्राधिकरणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाशेजारी सेक्टर क्रमांक 26 येथे 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2019 दरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. सोमवारी (दि. 30), मंगळवारी (दि.1), बुधवारी (दि.2) तीन दिवस सायंकाळी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. परिसरातील विविध मंडळाचे जोगवे, गोंधळ, गवळणीचे सादरीकरण होणार आहे. तसेच दररोज सायंकाळी आठ नंतर रास दांडियाचा कार्यक्रम होणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रावण दहन होणार आहे.

शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी पाच ते आठ या वेळेत समूहनृत्य स्पर्धा होणार आहे. पहिल्या तीन क्रमांकास पुणेज् प्राईड द अॅडव्हेंचर रिसॉर्टचे पूर्ण दिवसाचे गिफ्ट व्हाऊचर व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. शनिवारी (दि.5) प्राधिकरण सौंदर्यसम्राज्ञी (पारंपारिक वेशभूषा) स्पर्धा होणार आहे. पहिल्या तीन क्रमांकास चिंचवड येथील वस्त्रकला पैठणी यांच्याकडून पैठणी आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

रविवारी (दि.6) सायंकाळी पाच वाजता दुर्गाष्टमी होम होणार आहे. तर, सायंकाळी साडेसात वाजता नितीन महाजन यांच्या पथकाचा शंखनाद घोष होणार आहे.

या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. आकुर्डी पोलीस चौकीजवळील अमित गावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नावनोंदणी सुरु आहे. अधिक माहितीसाठी आश्लेशा यांच्याशी 9767577719 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.