Nigdi News: प्राधिकरणात 64 हजारांची घरफोडी

अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून टीव्ही, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 64 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि.6) सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे.

प्रवीण रामचंद्र वाघमारे (वय 50, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 5) दुपारी दोन ते रविवारी (दि. 6) सकाळी सात या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा कुलूप लाऊन बंद होता.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून टीव्ही, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.