Nigdi News : नियोजनपूर्वक अभ्यासाने उद्दिष्टे गाठा- सचिन लोखंडे

एमपीसी न्यूज –  स्वतःला कमी न समजता क्षमतेपेक्षा जास्त ध्येय ठेवा व नियोजनपूर्वक अभ्यासाने उद्दिष्टे गाठता येणे शक्य आहे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे ( Nigdi News ) उपशिक्षणाधिकारी सचिन लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल, निगडी येथील दहावीच्याा  विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी  व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या प्रमुख्याध्यापिका  मृगजा  कुलकर्णी, प्रशालेचे प्राचार्य प्रकाश पाबळे, संस्थेचे आजीव सदस्य राजीव कुटे, पर्यवेक्षिका वर्षा  पाचारणे उपस्थित होते.

उपशिक्षणाधिकारी .लोखंडे सचिन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उर्वरित दिवसांतील अभ्यासाचे नियोजन, स्वतःचे आरोग्य व आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून काही कृती करवून घेत ध्येय स्वतःच्या क्षमतेपेक्षा उच्च ठेवले पाहिजे असे सांगून वाचन, मनन व टिपण या पद्धतीने अभ्यास करण्याविषयी मार्गदर्शन केले.

 

Mahrashtra News : बोर्ड परिक्षांचा ताण येतोय…. डोन्ट वरी…आता मंडळातर्फे समुपदेशनाचीही सुविधा

 

प्रास्ताविक भाषणात  प्रकाश पाबळे यांनी बोर्डाची परीक्षा इतर परीक्षांप्रमाणेच मानावी व कोणताही मनावर ताण न घेता भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे सांगत दहावीनंतरच्या अभ्यासक्रमावर त्यांनी प्रकाश टाकला व सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

योगीशा सोनवणे, समता कांबळे, .वैष्णवी भुजबळ ह्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक  रामचंद्र घाडगे यांनी आपले शिक्षक मनोगत व्यक्त केले शिस्त, संस्कार आणि नम्रता हे यशाचे गमक आहे, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये मृगजा कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले.

 

शालेय शिक्षणाचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे दहावी पर्यंतचे शिक्षण असते. आई-वडील व शिक्षकांच्या सुसंस्काराने विद्यार्थी सुरक्षित असतात. त्यामुळे शिक्षक व शाळा यांचे संस्कार विद्यार्थ्यांनी आयुष्यात केव्हाही विसरू नये. तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्यात उत्तमच यश साध्य करा; परंतु आपले पाय मात्र नेहमी जमिनीवरच ठेवा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

 

बोर्ड परीक्षा महत्त्व, पेपर सादरीकरण, अभ्यासाचे नियोजन करताना घ्यावयाची काळजी याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपली उत्तर पत्रिका परीक्षक आणि शिक्षकांबरोबर बोलली पाहिजे असे सादरीकरणाचे तंत्र त्यांनी सांगत परीक्षकांची मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी उत्तरपत्रिका मांडणीचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रशांत कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय गौरी देशपांडे यांनी केला. गंगाधर वाघमारे यांनी बोर्ड परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाविषयी मार्गदर्शन केले. वर्षा पाचारणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

सदर कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, शाळा समिती अध्यक्ष चिंतामणी घाटे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तर गंगाधर सोनवणे, दिलीप गुंड यांसोबतच सुजाता ठोंबरे.मनीषा बोत्रे, उमर शेख,अमृता गायकवाड व जयश्री चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.