Nigdi News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते पाच या कालावधीत खानदेश मराठा हॉल, काचघर चौक, प्राधिकरण येथे होणार आहे.

मंगळागौर स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक संघात किमान आठ स्पर्धक असावे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी केल्यानंतर आयोजकांकडून स्पर्धेसाठी नवीन व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात येणार आहे. त्याची लिंक सर्व स्पर्धकांना पाठवण्यात येईल. त्यावर स्पर्धेचे सर्व नियम सांगितले जाणार आहेत.

प्रत्येक संघासाठी सादरीकरणासाठी सात मिनिटांचा कालावधी असेल. प्रथम क्रमांक पाच हजार, द्वितीय क्रमांक तीन हजार, तृतीय क्रमांक दोन हजार आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.

स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी शर्मिला महाजन (9822870118), वृंदा गोसावी (9921775198), मनीषा नातू (8149237898) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.