Nigdi News : ‘कापड, हार्डवेअर, भांडी, चप्पल विक्री दुकानांना चार तासांसाठी परवानगी द्या’

रूपीनगर -सहयोगनगर व्यापारी असोसिएशनची मागणी

एमपीसीन्यूज : कापड विक्री, चप्पल, हार्डवेअर आणि भांडी विक्रीच्या दुकानांमध्ये अन्य दुकानांपेक्षा गर्दी कमी असते. त्यामुळे या दुकानांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन होते. गेले वर्षभर समाधानकारक व्यवसाय न झाल्याने मोठी आर्थिक झळ सोसली आहे. आता दुकाने बंद ठेवलीतर व्यवसायच बंद करावा लागेल. त्यामुळे किमान चार तासांसाठी तरी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रूपीनगर -सहयोगनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात असोशिएशनचे अध्यक्ष विक्रम छाजेड यांनी कापड विक्री, चप्पल, हार्डवेअर आणि भांडी विक्री करणाऱ्या दुकानदारांची कैफियत मांडली. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून आजपर्यंत या दुकानदारांचे खूप नुकसान झाले.

_MPC_DIR_MPU_II

आता नव्या लॉकडाऊनमुळे खरोखर उपासमारीची वेळ येणार आहे. शिवाय दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, बँकांचे हफ्ते, वीज बिल, घर खर्च याची तरतूद कशी करायची, हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना विरोधातील लढाईत आम्ही सरकारसोबत आहोतच. आम्हीही कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करु, पण सरसकट आमची दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा. दिवसात किमान चार तास तरी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी असोशिएशनचे अध्यक्ष विक्रम छाजेड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.