Nigdi news: क्रिकेट बरोबरच इतर खेळांनाही प्रोत्साहनाची गरज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

निरामय आरोग्यासाठी प्रत्येकाने कोणताही एक खेळ खेळलाच पाहिजे

एमपीसी न्यूज – आपल्या देशात क्रिकेटला  ( Cricket)  प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. मात्र, जगात लोकप्रिय असणा-या फुटबॉल ( Football) खेळाला त्याप्रमाणात प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे क्रिकेट बरोबरच इतर खेळांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( commissioner Of Police Krishna prakash यांनी केले.

खेळ हा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या निरामय आरोग्यासाठी प्रत्येकाने कोणता तरी एक खेळ खेळलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांच्या 95 व्या जयंती ( jayanti) निमित्त शिवसेना यमुनानगर (shivsena Yamunanagar) शाखा, युवासेना, सुलभाताई उबाळे सोशल फाऊंडेशन ( Sulbhatai Ubale sosial Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगर येथे आयोजित राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते आज (शनिवारी) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

तत्पूर्वी कृष्ण प्रकाश यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. युवासेनेचे अजिंक्य उबाळे, आकाश सेंगर यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

खेळाडूंना मार्गदर्शन करताना कृष्ण प्रकाश म्हणाले, फुटबॉल खेळालाही उंची प्राप्त करून देणे आवश्यक आहे. खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे. मैदानात प्रेक्षक असतील तर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल आणि खेळांना प्रायोजक मिळण्यासही मदत होईल.

कबड्डीला प्रेक्षक लाभल्यानंतर प्रायोजक मिळायला सुरूवात झाली. खेळ हा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या निरामय आरोग्यासाठी प्रत्येकाने कोणता तरी एक खेळ खेळलाच पाहिजे.

आपल्या जीवनात कधी-कधी नकारात्मकता येते. मात्र, अशावेळी खचून जाऊ नका, वाममार्गाला लागू नका. आपले कार्य आणि कर्तव्याशी बांधील राहून टीकाकारांना तुमचे कौतुक करायला भाग पाडा, असा सल्लाही प्रकाश यांनी दिला.

शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी प्रास्ताविक केले.

शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका शुभांगी बो-हाडे, रामभाऊ उबाळे, सचिन सानप, आबा भोसले, अनिल सोमवंशी, निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, अंकुश जगदाळे, जानी भाई, गणेश इंगवले, संजय बो-हाडे, शिवाजीराव मोहिते, महेश डोके, शशिकला उभे, भारती चकवे आदी उपस्थित होते.

अनिकेत येरुणकर, लोकेश मुचंडीकर, सार्थक दोशी, किरण वाडकर, सूरज कदम, स्वप्नील पाटोळे, शंतनू खानापुरे, कौस्तुभ गोळे, गणेश शिंदे आदींनी स्पर्धेचे आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.