Nigdi News : गुंतवणूक करण्यास सांगत व्यावसायिकाची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीने व्यावसायिकाकडून आठ लाख रुपये घेतले. गुंतवणूक केल्यास दरमहा 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र व्यक्तीने व्यावसायिकाला कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार 1 जानेवारी ते 6 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.

कौशल प्रकाश पांचाल (वय 33, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक गोरख खरात (रा. लोढा बेलमोंडो, गहुंजे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना ‘रियल इस्टेटमध्ये जास्त फायदा आहे. तुम्ही रियल इस्टेटमध्ये माझ्याकडे आठ लाख रुपये गुंतवा मी तुम्हाला दरमहा 40 हजार रुपये देईल व शेवटी राहिलेल्या नफ्यातून 50 टक्के नफा देतो’ असे सांगितले. फिर्यादीकडून आठ लाख रुपये घेऊन त्यांना कोणताही परतावा न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.