Nigdi News : ‘होली मिलन’ कार्यक्रमात नागरिकांनी लुटला रंगाचा आनंद

एमपीसी न्यूज-  गाण्यांवर भन्नाट डान्स करीत युवक, मुलं, महिला आणि जेष्ठ नागरिकांनी होळीच्या रंगात न्हाऊन होळी व महिला दिन एकत्र साजरा केला. श्री गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशन, काळभोरनगर येथील हनुमान मित्र मंडळाच्या वतीने ‘होली मिलन’ या सांकृतिक कार्यक्रमाचे ( Nigdi News ) निगडीतील यमुनानगर येथे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक विजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता, देवानंद गुप्ता, वकील गुप्ता, उमाशंकर गुप्ता, अशोक गुप्ता यांनी दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी रचना गुप्ता, पौर्णिमा गुप्ता, प्रेरणा गुप्ता, श्रिया गुप्ता, सृष्टी गुप्ता, आर्य गुप्ता, मधु गुप्ता, पूनम गुप्ता, साधना गुप्ता, शीला गुप्ता, रागिणी गुप्ता, सरोज गुप्ता, रत्ना गुप्ता, रिंकू म गुप्ता, सनी गुप्ता, प्रज्वल गुप्ता, शिवम गुप्ता, सूरज गुप्ता, शुभम सरपाले, महिला वर्ग आणि तरुणाई मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते.

 

Tathwade News : शिवज्योत घेऊन निघालेल्या टेम्पोला ताथवडे जवळ कंटेनरची धडक, 35 शिवभक्त जखमी

 

उपस्थितांनी गाणी, डान्स, गेम्स आणि जेवनाचा मनमुराद आनंद लुटला. महिलांचा गुलाबी अन पुरूषांचा आकर्षक भगवा फेटा लक्ष वेधून घेत होता. यावेळी लहान मुली, तरुण मुलं आणि महिलांनीदेखील स्टेजवर नृत्य करीत कार्यक्रमात ‘माहोल’ तयार केला. संगीत खुर्ची, डान्स तसेच इतर स्पर्धेतील ( Nigdi News ) सहभागी विजेत्या महिला, मुली यांना आकर्षक बक्षीसांचे वाटप करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.