Nigdi News : यमुनानगरला कोरोना लसीकरण केंद्र सुरु

क्रीडा सभापती व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसीन्यूज : निगडी, यमुनानगर येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक (प्रभाग क्र.13 ) आणि क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी दिली.

प्रभाग 13  मध्ये सेक्टर 22  मधील यमुनानगर दवाखान्यात लसीकरण सुरु आहे. मात्र, मोठी लोकसंख्या असलेल्या या प्रभागामुळे त्या केंद्रावर मोठा ताण येत होता. परिणामी ज्येष्ठ आणि गंभीर आजार असलेले 45 वर्षावरील नागरिकांना रांगेत अधिक वेळ उभे राहावे लागत होते.

दुसरीकडे कोरोना पुन्हा वेगाने परतला आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण होणे गरजेचे असल्याने यमुनानगर येथील ठाकरे मैदानातील स्केटिंग रिंग या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र आठ दिवसात उभारले, त्याबद्दल पालिका आयुक्त व प्रशासनाचे आभार त्यांनी मानले.

यामुळे यमुनानगर दवाखान्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन ज्येष्ठ व गंभीर आजार असलेल्यांना तातडीने लसही मिळेल तसेच 45 ते 60 वय असणाऱ्या नागरिकांना सुद्धा 1 एप्रिल पासून लस या ठिकाणी मिळणार, असे ते म्हणाले.

प्रभागातील नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा तसेच नागरिकांना याबाबत समस्या असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.