Nigdi News : ‘स्वरांगण’च्या 48 दृष्टिहीन कलाकारांना शिधा वाटप

एमपीसी न्यूज – जैन सोशल ग्रुप, आनंद ग्रुप, यूथ सेंट्रल, डायमंड आणि नगर रस्ता यांच्या वतीने निगडी येथील स्वरांगण दृष्टिहिन संस्थेच्या 48 अंध कलाकारांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. बुधवारी (दि.12) निगडीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आनंद ग्रुपचे विलास पगारिया, युथ पुणे सेंट्रलचे प्रीतम भटेवरा, डायमंडपीसीचे अतुल धोका, नगररोडचे राजेश जैन, महाराष्ट्र रिजनचे वाईस चेअरमन दिलीप मेहता, सर्व्हिस टू नीडी या समितीचे संतोष छाजेड, प्रकाश शहा आणि नवीन शहा तसेच सर्व संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी म्हणून ही मदत करण्यात आली. स्वरांगण दृष्टिहिन संस्थेच्या वतीने मदत करणाऱ्या सर्व संस्थांचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.