Nigdi News: प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. अभय दिवाण यांचे निधन

एमपीसी न्यूज – निगडी येथील प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ.  डॉ अभय अच्युतराव दिवाण (वय  52) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. सुवर्णा दिवाण, मुलगा, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.

 1996 पासुन निगडी येथील बी जी कॉर्नर येथून आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या डॉक्टर दिवाण यांनी तेथेच एक सूसज्ज आणि अद्यावत सेवा असलेले मोठे रुग्णालय बांधले होते. विविध शस्त्रक्रिया आणि अस्थीरोग निदान त्यांच्याकडे होत असे. सामान्य कुटुंबातील एक असूनही आपल्या वैद्यकीय कौशल्याचे जोरावर अल्पवधीतच त्यांनी चांगला नावलौकिक कमावला होता. गरीब रुग्णाना त्यांच्याकडे पैसे असले नसले तरी उपचार केले जात होते, त्यामुळे त्यांच्या अकाली जाण्याने निगडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी डॉ सुवर्णा दिवाण आणि मुलगा डॉ ईशान दिवाण,दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे. डॉ. अभय दिवाण हे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील मूळचे रहिवासी होते. त्यांनी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण केले. एमबीबीएस आणि एम एस पर्यंतचे शिक्षण होईपर्यंत प्रत्येक वर्षी ते गोल्ड मेडलिस्ट होते.

निगडी येथे त्यांचे दिवान हॉस्पिटल आहे. बुधवारी (दि. 12) रात्री त्यांचा झोपेतच आकस्मित मृत्यू झाला. निगडी स्मशानभूमी येथे गुरुवारी (दि. 13) दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.