Nigdi News : कारगिल युद्धात पराक्रम गाजविलेल्या माजी सैनिकांचा रुपीनगर येथे गौरव

एमपीसीन्यूज : 26 जुलै 1999, कारगिल विजय दिवस. जवळजवळ 527 भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानातून प्रतिकूल परिस्थितीतही भारताने पाकिस्तानवर मिळवलेला अविस्मरणीय विजय. हा विजय दिवस साजरा करण्यासाठी आणि कारगिल युद्धात पराक्रम गाजवलेलया माजी सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुपीनगर-तळवडे येथील शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल भालेकर यांनी माजी सैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

या वेळी प्रत्यक्ष कारगिल युद्धात पराक्रम गाजवलेले माजी सैनिक बाळाराम उत्तेकर, बळीराम गोळे, प्रभाकर सपकाळ, श्री. महाडिक मामा, श्री. शेलार मामा यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत जाधव, रविराज शेतसंधी,अरुण सोनवणे उपस्थित होते.

सत्कारमूर्ती माजी सैनिकांच्या तोंडून कारगिल युद्धाच्या आठवणी ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. देशाविषयी आणि सैन्याविषयी त्यांना असलेला अभिमान ओसंडून वाहत होता. यामुळे तरुण पिढीला अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले. ‘कुणालातरी आमची आठवण आली…’ हे त्यांचं वाक्य ऐकून उपस्थित प्रत्येकाच्या मनाला खंत वाटली.

अमोल भालेकर म्हणले, ‘रुपीनगर भागात हे भारतमातेचे वीर सुपुत्र राहतात याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे उपकार कधीही न फिटणारे आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद असेच लाभावेत. समाजात सैन्याविषयी आदर आणि प्रेम वृद्धिंगत व्हावा, यासाठी प्रयत्न करणार’.

आशिष मोटे, दर्पण येवले, राकेश बिराजदार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.