Nigdi News : शिक्षकांसाठी ‘कॉपीराइट आणि आयपीआर’ बद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान

एमपीसी न्यूज – निगडीतील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च संस्थेत शिक्षकांसाठी ‘कॉपीराइट आणि आयपीआर’ बद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

पुण्यातील आय स्क्वेअर आयटी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत गडाख यांनी कॉपीराइटचे पैलू, प्रक्रिया तसेच, पेटंट फायलिंग, ड्राफ्टिंग आणि डिजिटल सिग्नेचर याविषयी शिक्षकांना माहिती दिली.

या माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन आज (बुधवारी) ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. एमसीए विभागाच्या डायरेक्टर डॉ. दीपाली सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले. तर, अस्मिता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.