Nigdi News : कारसाठी व नवीन कंपनीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – हुंड्यात कार साठी व नीव फ्लॅटसाठी पैसे दिले नाहीत, जावयाला कंपनी चालू करुन दिली नाही म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसीक छळ केल्या (Nigdi News) प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने  निगडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.13) फिर्याद दिली असून  पती,सासू व मामे सासरे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.हा प्रकार 19 मे 2022 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत आकुर्डी येथे घडला आहे.

PCMC : यापुढे राज्याबाहेरील पदवी असणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांची बढती बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लग्नात कार, नवीन फ्लॅट हुंड्यात दिला नाही यावरून पती छळ करत होता. पुढे त्याने कंपनी टाकून देण्याचे फिर्यादीच्या माहेरी मागणी केली मात्र ती ही पुर्ण न झाल्याने त्याने दारु पिऊन पिडीतेला मारहाण केली. पिडीतेशी अनैसर्गीक शारीरिक संबंध ठेवले, मामे सासऱ्यानेही पिडीतेचा विनयभंग केला. यावरून आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Nigdi News) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.