_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Nigdi News : ‘आयआयसीएमआर’मध्ये एमसीएच्या विद्यार्थ्यांचा दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – निगडीतील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंटअँड रिसर्च (आयआयसीएमआर) एमसीएच्या विद्यार्थ्यांचा दिक्षारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला.

30 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस ऑनलाईन माध्यमाद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिक्षारंभ कार्यक्रमासाठी जवळपास 150 विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयआयसीएमआर’च्या संचालिका डॉ. दीपाली सवाई यांनी संस्थेतील विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत, संस्थात्मक उद्दिष्ट स्पष्ट करून संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर आणि सायबर सीक्यूरीटी अँड सी. ई .ओ सायबर सीक्यूरीटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हेरॉल्ड डीकोस्टा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. डीकोस्टा यांनी विद्यार्थ्यांना ‘सायबर सीक्यूरीटी आणि इन्वेस्टीगेशन’ या विषयातील विविध संकल्पना व त्यातील विविध करिअरच्या संधी याबाबत माहिती दिली. येणा-या काळात या क्षेत्रात मोठ्या मनुष्य बळाची गरज आसल्याचे त्यांनी नमूद केले. सायबर स्टॉकिंग, सायबर कॉन्ट्राबँड, सायबर ट्रेस पासिंग, सायबर लॉन्ड्रिंग, सायबर वाँडलीसम, सायबर डीफेमेशन, सायबर टेरररिसम, सायबर पोर्नोग्राफी आणि सायबर फ्रॉड अशा सायबर गुन्हेगारीच्या प्रकारांबद्दल त्यांनी माहिती दिली. 2020 पर्यंत सायबर गुन्हेगारीचे प्रमाण तीन पटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. डिकॉस्टा यांनी एखाद्या सायबर गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने केला जातो याचे उदाहरणासहित स्पष्ट केले. इंटरनेट किंवा मोबाईल द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती दिली.

डॉ .पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन दोन वर्षांच्या एमसीए प्रोग्रॅम बद्दलची माहिती देताना सांगितले, नवीन एमसीए अभ्यासक्रम हा प्रकल्पांवरवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम तयार करण्यात आयआयसीएमआर संस्थेचा मोलाचा वाटा आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे संगणक क्षेत्रात नवीन संधी निर्माण होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असे सांगितले. विद्यापीठाच्या एमसीए परीक्षेत गुणवत्ता यादीत सहाव्या क्रमांक पटकावणा-या प्रीती ननावरेने तिचा अनुभव सांगत आपल्या यशात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

दिक्षारंभच्या दुसऱ्या दिवशी एमसीए विभागप्रमुख रेणू मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर एमसीए प्रथम वर्षाचे शिक्षक, विषय, अकॅडेमिक कॅलेंडर, ऍड ऑन कोर्सेस, प्री- प्लेसमेंट ट्रैनिंग, परीक्षा, वेबसाईट, आर्को, एएसआर, मेन्टॉरिंग, लाईफ स्किल, क्विझ आणि रिसर्च या वेगवेगळ्या विभाग व त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. किरण शिंदे यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.