Nigdi News: इंडो ॲथलेटिक्सतर्फे जलशुद्धीकरण केंद्रातील महिलांना सायकल वाटप

Nigdi News: इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे जलशुद्धीकरण केंद्रातील सहा महिलांना सायकल

एमपीसी न्यूज : आंतरराष्ट्रीय जलदिनानिमित्त इन्डो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडीतील जलशुद्धीकरण प्रकल्प येथे काम करणाऱ्या सहा महिलांना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, उद्योजक अण्णा बिरादर, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, भावसार व्हिजनचे दीपक भावसार,देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे, रेल्वेचे अधिकारी ऋषिकेश पोटे उपस्थित होते.

जलशुद्धीकरण येथे कामासाठी येणा-या कर्मचारी महिला दहा पंधरा किलोमीटरवरून चालत येतात. हे तत्कालीन अधिकारी प्रवीण लडकत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पर्यावरण मित्र धनंजय शेडबाळे यांच्याकडे यासंदर्भात चर्चा केली. शेडबाळे यांनी आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो ॲथलेटिक्स सोसायटी यांना संपर्क केला. या संस्थेने तत्काळ होकार देत महिलांसाठी सायकल उपलब्ध करुन दिल्या. जलदिनी सायकलचे वाटप करण्यात आले. सर्व महिलांचा महिला विभागाच्या प्रमुख अमृता पाटील यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

”सायकल चालवल्यामुळे अनेक फायदे होतात. वेळ वाचतो पर्यावरणाला मदत होते. व्यायाम होतो, पाणी प्रदूषण देखील होत नाही”, असे धनंजय शेडबाळे म्हणाले.कार्यक्रमासाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे प्रा. योगेश तावरे,गिरीराज उमरीकर,रमेश माने,अजित गोरे,मारुती विधाते,कैलास शेठ तापकीर, अविनाश चौगुले, रवी पाटील, अमित पवार, भूपेंद्र केळकर, कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.