Nigdi news: महावितरण कार्यालयावर भाजपचे ‘जागा हो कुंभकर्णा’ आंदोलन

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील महावितरणाच्या गैरकारभारामुळे परिसरातील घरगुती वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वीज वापरापेक्षा वाढीव बीले देण्याचे प्रकार सूरु असून, दुरुस्तीसाठी ग्राहकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर खराब सामग्री वापरल्यामुळे या भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याचा आरोप करत भाजपने प्राधिकरणाच्या महावितरण कार्यालयावर ‘जागा हो कुंभकर्णा’ आंदोलन केले.

यावेळी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अनुप मोरे, महाराष्ट्र राज्य विद्यत वितरण समिती सदस्य समीर दिलीप जावळकर, भाजपा प्राधिकरण-चिंचवड स्टेशन मंडल अध्यक्ष विजय शिनकर, सचिन कुलकर्णी, सलीम शिकलगार, राधिक बोर्लीकर, मनोज देशमुख, आनंद देशमुख, सचिन बंदी, रमेश घाटे, केतन जाऊळकर, नरेंद्र येलकर, देसाई, प्रसेन अष्टेकर, नीलिमा कोल्हे व परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण कार्यालयास कुंभकर्णाची प्रतीकात्मक प्रतिमा देऊन निषेध नोंदविण्यात आला. तसेच ‘कुंभकर्णगत अवस्थेतून बाहेर पडा व कारभार सुधारा’ अन्यथा घरी जाणे देखील मुश्कील होईल, असा इशारा महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.