
Nigdi News: अल्पवयीन मुलींचे अपहरण; निगडीत दोन तर वाकड परिसरात एक घटना

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचा तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी निगडी परिसरात दोन तर एक घटना वाकड परिसरात घडली आहे.

पहिली घटना आकुर्डी येथील गणेश अपार्टमेंट शिवशक्ती चौक येथे शुक्रवारी (दि.2) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीची चुलत बहीण यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची अल्पवयीन चुलत बहिण हिला अज्ञात आरोपींनी कशाची तरी फूस लावून पळवून नेले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अपहरणाची दुसरी घटना चिंचवड येथील अजंठा नगर याठिकाणी गुरुवारी (दि.1) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपींनी कशाची तरी फूस लावून पळवून नेले आहे.
अपहरणाची तिसरी घटना पुनावळे येथील कैलास नगर ओव्हाळवस्ती येथे गुरुवारी (दि.1) चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्निल सुनील पगारे (वय. 19, रा. पुंडी, ता.अष्टी, जि.बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला आरोपी पगारे याने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
