Nigdi News : म्हाळसाकांत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – म्हाळसाकांत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती (रविवारी, दि.3) उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून शासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्त म्हाळसाकांत विद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपसभापती नाना शिवले, पोलीस निरिक्षक आशा शेवाळे, पत्रकार आशा साळवी, प्राचार्य सुनिल लाडके, महिला शिक्षिक व विद्यार्थिनी उपस्थितीत होत्या.

शिवले यांनी यावेळी आपले विचार मांडले. आज विविध क्षेत्रात उच्च पदावर ज्या स्त्रिया कार्यरत आहेत आणि यापूर्वीही होत्या, त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे हे शक्य झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली

औरंगाबाद शहर गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक आशा शेवाळे यांनी तत्कालीन सावित्रीबाई आणि आत्ताच्या सावित्रीच्या लेकी यांच्यातला फरक कवितेतून सादर केला. पत्रकार आशा साळवी यांनी सावित्रीबाईं यांच्याविषयी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.

म्हाळसाकांत विद्यालयाच्या विद्यार्थिनी तेशवानी वेताळ, संघमित्रा तायडे, हर्षला जाधव यांनी सावित्रीबाईंचे कार्य विस्तृत शब्दात व्यक्त केले. याप्रसंगी कोविड योद्धा म्हणून आशा शेवाळे, आशा साळवी यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अनुजा बोरुडे हिने पखवाज वादन करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयाच्या अकरावीतील विद्यार्थिनींनी कथक नृत्यातून गुरु वंदना सादर केली.

शिक्षिका माधुरी पवार व आशा होळ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य सुनिल लाडके यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.