Nigdi News : ‘चला व्यसनाला बदनाम करु या’ ; ‘अंनिस’तर्फे दारूच्या बाटलीला जोडे मारा अभियान

एमपीसी न्यूज – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरला संपूर्ण जगभर मद्यपान करून धिंगाणा घातला जातो. व्यसनाला विरोध करत ही प्रथा मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, निगडी शाखेच्या वतीने ‘चला व्यसनाला बदनाम करु या, दारूच्या बाटलीला जोडे मारा अभियान’ राबविण्यात आले.

निगडी प्राधिकरण, भेळ चौक याठिकाणी गुरुवारी (दि.31) संध्याकाळी 6.30 ते 7.30 दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला‌‌.

यावेळी डॉ. राजेंद्र कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निगडी शाखा अध्यक्ष प्रदीप तासगावकर, कार्याध्यक्ष अशोक जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ‘द नव्हे दारूचा, तर द दुधाचा’ हे अभियान राबवत दूध वाटप करण्यात आले. मद्यपान शरिरासाठी घातक आहे. 31 डिसेंबरला दारु पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याची प्रथा आणि मद्यपानाला मिळालेली प्रतिष्ठा मोडित काढायची आहे, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.