Nigdi News: पुस्तकरुपी मदत हवी असल्यास ग्रंथालयांनी संपर्क साधावा, सावरकर मंडळाचे आवाहन

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ग्रामीण भागात वाचन संस्कृती पोहचविण्यासाठी दरवर्षी पुणे जिल्ह्यातील दोन ग्रंथालयांना पुस्तकरुपी मदत केली जाते. यावर्षी देखील पुस्तकरुपी मदत केली जाणार असून मदत हवी असणा-यांनी 9822604751 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रंथालय कार्यवाह प्रदीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयातर्फे वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी वाचन संस्कृती ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील दोन लहान ग्रंथालयांना पुस्तकांच्या रुपाने मदत केली जाते.

ग्रंथालयाचा येत्या 14 फेब्रुवारी रोजी 38 वा वर्धापनदिन संपन्न होत आहे. त्यामुळे यंदा देखील पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन ग्रंथालयांना पुस्तकांच्या रुपाने मदत केली जाणार आहे. पुस्तकरुपी मदत हवी असणा-या ग्रंथालयांनी ग्रंथालय कार्यवाह प्रदीप पाटील यांच्याशी 9822604751 यांच्याशी या नंबर 31 जानेवारी पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष ग्रंथालयात संपर्क केला तरी चालेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.